प्रशासन

रायगड जिल्ह्याचे प्रशासकीयदृष्ट्या प्रमुख स्थान `अलिबाग' हे आहे. या जिल्ह्यात १५ तालुके असून त्यांची सूची पुढीलप्रमाणे

उरण १८६.४ चौ. कि. मी.
पनवेल ६४२.९ चौ. कि. मी.
कर्जत ६७९.६ चौ. कि. मी.
खालापूर २१३.६ चौ. कि. मी.
पेण ५०८.८ चौ. कि. मी.
अलिबाग ५०१.८ चौ. कि. मी.
मुरुड २३४.५ चौ. कि. मी.
रोहा ६४४.७ चौ. कि. मी.
सुधागड (पाली) ४६७.० चौ. कि. मी.
माणगाव ६८३.४ चौ. कि. मी.
तळा २५०.० चौ. कि. मी.
श्रीवर्धन १२४.० चौ. कि. मी.
म्हसाळे २३५.९ चौ. कि. मी.
महाड १,२६१.३ चौ. कि. मी.
पोलादपूर ३७२.९ चौ. कि. मी.

 

नागरी व ग्रामीण प्रशासन

  • नगरपालिका : पनवेल, खोपोली, अलिबाग, महाड, पेण, रोहे, उरण, मुरुड-जंजिरा, श्रीवर्धन, माथेरान, कर्जत
  • पंचायत समित्या : अलिबाग, पेण, मुरूड, पनवेल, कर्जत, खालापूर, उरण, महाड, पोलादपूर, म्हसाळे, श्रीवर्धन, माणगाव, सुधागड, लोहे, तळा
  • ग्रामपंचायती ८४४
  • गावं १८५९.

राजकीय संरचना

  • लोकसभा मतदारसंघ - (२) एक रायगड व दुसरा मावळ जो पुणे व रायगड या दोन जिल्ह्यांतील विधानसभा मतदारसंघाचा मिळून तयार झाला आहे.
  • विधानसभा मतदारसंघ -(७) पनवेल, कर्जत, उरण, पेण, अलिबाग, श्रीवर्धन व महाड असे ७ विधानसभा मतदारसंघ आहेत.

येथे जिल्हा परिषदेचे ६१ तर पंचायत समितीचे १२२ मतदारसंघ आहेत.