सी. डी. देशमुख (C D Deshmukh)

C D Deshmukh

रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर, ज्येष्ठ अर्थतज्ञ चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख (सी.डी.देशमुख) यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील नाते या गावचा. त्यांचे बालपणही जिल्ह्यातील तळे व रोहा येथे गेले. त्या काळात अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या जगन्नाथ शंकरशेट संस्कृत शिष्यवृत्तीचे हे सर्वप्रथम विजेते होते. इंडियन सिव्हिल सर्व्हिस या परीक्षेत १९१८ साली सर्वांत अधिक गुण मिळवणारे हे पहिले भारतीय ठरले. हा विक्रम नंतर इतर कुणीही भारतीय मोडू शकला नाही. १९३७ साली सर ही उपाधी देऊन ब्रिटिश सरकारने त्यांच्या विद्वत्तेचा गौरव केला. १९५० च्या मे महिन्यात भारताचे अर्थमंत्री म्हणून त्यांची नेमणूक झाली. उत्तम प्रशासकीय सेवेबद्दल मॅगसेसे हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचे पारितोषिक १९५९ साली त्यांना मिळाले. भारताच्या पहिल्या पंचवार्षिक योजनेचे चिंतामणराव शिल्पकार होते. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र करण्याच्या प्रश्र्नाबाबत पंतप्रधान पंडित नेहरूंशी मतभेद झाल्याने त्यांनी केंद्रीय अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

Add new comment