भैरवनाथ जत्रोत्सव

bhairawnath jatra

रायगड जिल्ह्यातील गोरेगाव येथील पंचक्रोशीत एक आगळी वेगळी जत्रा पहायला मिळते. श्री भैरवनाथ हे पंचक्रोशीतील भाविकांचं लाडकं श्रद्धास्थान. दरवर्षी चैत्र महिन्यात प्रदोष काळात शी. भैरवनाथाचा जत्रोत्सव साजरा केला जातो. भैरवनाथ यांना रत्नजडीत मुखवटा चढवला जातो आणि मग यात्रेला खरी रंगत येते. या यात्रेच्न वैशिष्ट्य म्हणजे यात्रोत्सवासाठी भक्तीभावाने पीर दर्ग्यातून पीरबाबाला मानानं पालखीतून आणलं जातं. अशी ही सर्वधर्म जोपासणारी यात्रा. या यात्रेचा मुख्य कार्यक्रम म्हणजे लाट फिरवणे. गावाच्या पूर्वेकडच्या जंगलातून एनाच लाकूड आदल्या दिवशी आणलं जातं. त्याची रंगरंगोटी करून विधिवत पूजा केली जाते. या लाकडाला लाट म्हणतात. ही लाट जत्रेच्या दिवशी मंदिरासमोरील बगाडाव्रर चढवली जाते. ढोल ताशांच्या गजरात गावचे वतनदार खांद्यावर घेउन फिरवतात. भाविक याचा आनंद घेतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ही यात्रा चालू आहे असं म्हणतात. शेकडो वर्षांपासून चालू असलेली ही परंपरा आजच्या तरूण वर्गानेही चालू ठेवला आहे. विविध दुकाने, खेळ यातून लाखोंची उलाढाल होते. प्रचंड गर्दी असूनही ही जत्रा शिस्तबद्ध असते. पंचक्रोशीतील नागरिकांसाठी हा एक आनंदसोहळाच असतो.

Add new comment