काळकर्ते परांजपे (Kalkarte Shivram Paranjape)

kalkarte shivram paranjape

प्रखर राष्ट्रीय बाण्याचे साहित्यिक, निर्भीड पत्रकार व प्रभावी वक्ते म्हणून ख्याती असलेले शिवराम महादेव परांजपे हे मूळचे महाडचे रहिवासी होत. १८९८ साली त्यांनी काळ हे साप्ताहिक सुरू केले. तत्कालीन ब्रिटिश भारतातील ब्रिटिश शासनाच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध 'काळ' या मराठी साप्ताहिकातून त्यांनी केलेली टीकात्मक पत्रकारिता मराठी पत्रकारितेच्या इतिहासातील मानदंड समजली जाते. या साप्ताहिकातील जहाल लिखाणाबद्दल राजद्रोहाच्या आरोपावरून त्यांना एकोणीस महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा मिळाली. पुण्यात १९१३ साली झालेल्या मराठी नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. तसेच १९२९ साली बेळगाव येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. काळकर्ते परांजपे या नावानेच ते ओळखले जात.

Add new comment