साजगावची यात्रा - महाराष्ट्राची धाकटी पंढरी

sajgaon

खोपोली जवळील साजगावची यात्रा बोंबल्या विठोबाची यात्रा म्हणून ओळखली जाते. या यातेला अनेक वर्षांची परंपरा आहे. संत तुकाराम मिरचीचा व्यवसाय करायला या गावात येत असत अशी आख्यायिका आहे. तुकाराम विठ्ठलनामात लीन असताना लोकांनी मोबदला न देता मिरची नेली. नंतर तुकारामांकरता पांडुरंग कारकून म्हणून आले आणि ज्यांनी मोबदला दिला नव्हता त्यांच्याकडून पैसे गोळा केले. गावातील एक पहिलवान द्यायला तयार नव्हता तर त्यांनी मी बोंब मारेन आणि संपूर्ण गाव गोळा करेन असे ठणकावून सांगितले. त्याप्रमाणे गावातले लोक एकत्र येऊन त्यांनी पहिलवानाचे पैसे गोळा केले आणि पांडुरंगाकडे दिले. बोंब ठोकली. म्हणून या यात्रेला बोंबल्या विठोबाची यात्रा म्हणतात.

ही यात्रा सुक्या मासळीची यात्रा म्हणून प्रसिध्द आहे. राज्यातील व्यापारी आणि ग्राहक आवर्जून इथे येतात.१५ दिवसांत इथल्या मासळीची उलाढाल 6 ते 8 कोटींच्या घरात जाते. सुट्टे,बोंबील सोडे अशी सारी सुकी मासळी इथे मिळते. त्याप्रमाणेच घोंगडीसाठी देखील ही यात्रा प्रसिद्ध आहे. सोलापुरी चादरी पण विक्रीसाठी असतात. ही यात्रा सलग १५ दिवस चालते. खवय्यांसाठी पण भरपूर प्रकार उपलब्ध असतात.

Add new comment