मांडवा समुद्रकिनारा (Mandwa Beach)

mandwa beach

मांडवा अलिबागच्या उत्तरेस १०-१५ मैल आणि मुंबई गेट वे इंडिया पासून जवळचे असे सुंदर, अखंडित समुद्रकिनारा आहे. मांडवा हे अप्रतिम आणि प्रेक्षणीय समुद्रकिनार्याचे ठिकाण आहे. जेव्हा आकाश निरभ्र असते तेव्हा मांडवा ते गेट वे ऑफ इंडिया पर्यंतचे अविस्मरणीय दृश्य पाहायला मिळते. मांडवा गाव हे स्वत: नारळाच्या बागांनी सुशोभित असे ठीकाण आहे. अलिबाग एस्.टी. स्थानकापासून सुमारे १९ किमी. अंतरावर हे एक निसर्गसंपन्न बंदर आहे. अलिबाग-रेवस रस्त्यावर मांडवा फाटयावर उतरून बंदराकडे जावे लागते. इतर बंदरांप्रमाणे नैसर्गक सृष्टीसौंदर्याचे वरदान लाभल्यामुळे हे आगळेवेगळे असे पिकनिक पॉईंट झाले आहे. या बंदराच्या धक्कयाला मुंबईहून (गेट वे ऑफ इंडिया ) येणार्‍या पी.एन्.पी. सर्व्हसेस कॅटमरान अजंठा कॅटमरान यांच्या स्पीडबोट तसेच अजंठा सर्व्हीस अलसिद्दीक मोटार बोट लागतात. मांडव्याच्या समुद्रकिनारी अनेक धनिक लोकांचे बंगले तसेच फार्महाऊस आहेत.

Add new comment