काशीद समुद्रकिनारा (Kashid Beach)

kashid beach

अलिबाग-मुरुड महामार्गावरील अलिबागपासून ५०  कि.मी. अंतरावर व मुरूडच्या उत्तरेस जवळपास १८ किमी. अंतरावर गोव्यामधील बीचची आठवण करून देणारा रूपेरी वाळूचा स्वच्छ सुंदर काशिदचा समुद्रकिनारा विदेशी पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. तसेच या समुद्रकिनार्यामध्ये शक्यतो ‘पांढरऱ्या वाळूच्या’ क्षेत्रामध्ये सर्वात स्वच्छ व सर्वात सुंदर किनारा आहे. सुमारे रू.१,५०० ते रू. २०,००० पर्यंत अनेक कॉटेज आणि रिसॉर्ट्स उपलब्ध आहेत. समुद्रकिनाऱ्यावरील सर्व मजेदार वॉटर स्पोर्ट पण अनुभवू शकता. इथे छोठे-छोठे खाद्य पदार्थाचे स्टॉल आहेत. काशिदच्या किनार्‍यावरील सुरूंच्या नयनमनोहरी बागांतून विश्रांतीस थांबलेल्या पर्यटकांची गर्दी पाहूनच या स्थानाचे महत्व लक्षात येते. विकएंडला शेकडो पर्यटक इथे समुद्रस्नानासाठी जमतात. मॉडेंलिंग टि.व्ही. सिरीयल व सिनेमांचे शूटींग येथे सातत्याने होत असते. समुद्रकिनारी छोटया स्टॉलपासून परिपूर्ण सुविधा असणारी हॉटेल्स रिसॉर्टस् यामुळे काशिद बीच पर्यटकांचे मोठे आकर्षण बनला आहे.

Add new comment